Skip to content
AstroPaper
Go back

सासूबाईंचा कानमंत्र | भाग ४

Edit page

हं आठवतंय. त्यामुळे रविवारीसुद्धा तू मला कामाला जुंपायचीस. आणि सुरेश मात्र लोळत पडायचा.”  “अगं, कधी कधी तुझे दादा अगदी रंगात यायचे.” शालिनीबाईंनी तोंडाला पदर लावला आणि खुसखुसत हसल्या.” अगं, मग थोडी जास्तच कुस्ती व्हायची आमची. मग कधी कधी सकाळी उठल्यावर जरा त्रास व्हायचा इतकंच. आणि तोंडात घ्यायचंच म्हणत असतील तर ते तर तुझ्या दादांनी लग्नं झाल्यावर लगेचच चालु केलं होतं. म्हणजे तुझ्या दादांनी मला नकळतंच एकदा तिथे ओठ लावले. पहिल्यांदा मी पण हात पाय झाडले थोडे पण एकदा”तिथे”ओठ आणि जीभ लागली की काही सुचत नाही बघ. तू एकदा प्रयत्न का करू देत नाहीस अखिलेशरावांना?”शालिनीबाईंनी एका पायावर दुसरा पाय ठेवला. परत”तीच”सळसळ त्यांना जाणवू लागली.” पण मला नाही पटत. अगं तिथे सगळं कसं घाण असतं. याऽऽक!” तिने नाक मुरडले.” अगं तसं वाटत असेल तर दोघंही अंघोळ करून घ्या झोपण्यापूर्वी. पाहिजे तर कसले कसले स्प्रे मिळतात हल्ली. ते वापरत जा. आणि केसं काढण्याची क्रीमं मिळतातच की. तसं नाही काढले तरी चालतात म्हणा! नाहीतरी पुरुषांच्या दाढीमिशा सहन करतातच ना बायका? मग? तिथे केस असल्याने त्यांना काही अडचण होत नाही” “शी! माझी नाही हिंमत होणार? मला वाटत होतं की क्रीम हाता पायांवरचे केस काढण्यासाठी असतात. तेच तर दाखवतात जाहिरातींमधे”इश्य! मग जाहिरातीत काय”तिथले”केस काढतांना दाखवतील? ते क्रीम वापरून कुठलेही केस काढता येतात. अर्थात डोक्यावरचे सोडून. तुझे दादा आणायचे पहिल्यांदा ती क्रीमं. तुला काही भीती वाटत असली तर सांग.” पण माझा नाही विश्वास बसत. आणि मागून करतात का कोणी? शीः”अगं असं बघ. तुला काका किती? एकच ना? आणि आत्या पण नाही कोणी? मग तुझ्या आजी आजोबांनी काय भजनं करत वेळ काढला आयुष्यभर? त्या काळी हल्लीसारखं निरोध अन फिरोध पण मिळायचं नाही. एकदा-दोनदा केलं की पुढच्या महिन्यात बायका वांत्या करायला लागायच्या. मग हाच तर मार्ग होता संतती थांबवण्याचा. काय म्हणायचे बरं तुझ्या दादांनी सांगीतलं होतं एकदा. कामशास्त्राच्या कुठल्याश्या पुस्तकात पण लिहीलं आहे म्हणे तसं. हां हां मुखमैथुन. म्हणजे नवर्याने आणि बायकोनी तोडाने एकमेकांना करून द्यायचं आणि बायकोने नवर्याला मागून करू द्यायचं. आणि मागून करतो त्याला पण असंच काहीसं नांव आहे. काय बरं… ते जाऊ दे… नाव काहीही असू दे. पण नवरा-बायको दोघंही खुष. मुलं व्हायचं कसलं टेन्शन नाही. अगं सुरेश झाल्यानंतर दोन तीन वर्षांनी मग मी आप्रेशन करून घेतलं मुलं न होण्याचं. तोपर्यंत हेच उपाय वापरून प्ल्यानिंग केलं ना आम्ही.”

“ पण मला भीती वाटते गं. काही भलतंच झालं तर? माझी तिकडे जायची पंचाइत होइल.” तिने पंजाची पाची बोटं फुलवून उलटी केली.

“काही होत नाही गं. तसं पहिल्यांदा त्रास होतो म्हणा थोडा. पण होते सवय. पण तुझा नवरा कसा खुष होतो बघ!” शालिनीबाईं मांडी बदलून सावरुन बसत म्हणाल्या. ती मेली सळसळ काही केल्या जात नव्हती. तेव्हढ्यात बेल वाजली.” अगंबाई! अखिलेशराव आले वाटतं! मी दार उघडते. तू जा आत आणि जरा तोंडावरून पाणी फिरव आणि वेणी-फणी कर जरा. घरी आल्यावर नवर्याला प्रसन्न चेहेरा दाखवावा.” असं म्हणत त्यांनी तिला आत पिटाळलं आणि दार उघडलं.

अखिलेश आत आला. सासूबाईंना पाहून आश्चर्याचे भाव तोंडावर होते.” या या अखिलेशराव. तुमचीच आठवण काढत होतो आम्ही. मी सहजच आले होते.”  “वा! छान. ही कुठं दिसत नाही ती.”  “आहे हं. आतच आहे. मीच तिला सांगीतलं जरा हात पाय धुवून फ्रेश व्हायला. बायकोकडे बघीतलं की नवर्याला कसं प्रसन्न वाटायला पाहिजे.”

हां असंच सगळं मार्गदर्शन करत जा तिला म्हणजे झालं.”  “काही काळजी करू नका तुम्ही. तसं आमचं थोडं बोलणं झालंच आहे. समजावीन मी तिला. आणि बरंका आजची रात्र मी इथंच रहाणार आहे. जरा सगळं नीट बघूनंच जाणार आहे.”

वा! ठीकच आहे. मी आलोच जरा फ्रेश होऊन.” असं म्हणत अखिलेश आत गेला. तेव्हढ्यात बेडरुममधुन बाहेर येणार्या रमाला जवळजवळ टक्करलाच. बाहेर येणार्या रमाला पाहून तर तो बघतच राहिला. तिने व्यवस्थित केस विंचरले होते आणि साडी सुद्धा बदलली होती. एकदम फ्रेश दिसत होती. तिच्याकडे बघत त्याने शीळ घतली. रमा सुद्धा त्याच्याकडे बघत छान लाजली. तो बघत बघत आत गेला,

सगळ्यांनी एकत्र बसूनच चहा घेतला. अखिलेश हॉलमधे बसुन पेपर वाचत होता. समोर टीव्हीवर बातम्या चालु होत्याच. आठ वाजता सगळे जेवायला बसले. नऊ साडेनऊ पर्यंत आरामांत जेवणं आटोपली. परत थोडावेळ टीव्ही पाहून दहा वाजता झोपायची तयारी झाली. रमा आणि अखिलेश त्यांच्या बेडरुममधे गेले. दुसन्या बेडरुममधे शालिनीबाई गेल्या. पण थोड्याच वेळात पाणी पिण्याच्या बहाण्याने बाहेर आल्या आणि त्या दोघांच्या बेडरुमला सावधपणे कान लावत आतून काही भांडणाचे आवाज येत नाहीत याची खात्री केली. नंतर जरी त्या आपल्या बेडरुममधे गेल्या तरी त्यांनी दार उघडेच ठेवले होते आणि सावधपणे वाट बघत होत्या. बराच वेळ काही झाले नाही.

आणि साडे अकरा वाजता अखिलेश त्यांच्या बेडरुमचे दार उघडत बाहेर आला. शालिनीबाई टुण्कन उडी मारत उठल्या आणि आपल्या खोलीच्या दारापाशी येऊन अंधारातच कानोसा घेऊ लागल्या. बाहेर अखिलेश रागा रागातच लुंगी गुंडाळत बाहेर आला. त्याने खांद्यावर शर्ट लटकावला होता. हातात एक चादर आणि उशी होती.

लुंगी गुंडाळून झाल्यावर तो दाणदाण पाय आपटत हॉलमधे असलेल्या कोचावर गेला आणि त्याने धाडकन त्यावर अंग टाकले.

“च्यामायला जरा कुठे रंगात आलो होत तर हीच नेहेमीचंच. ऐन वेळी के एल पी डी करणार! काही नवीन ट्राय करायलाच तयार नाही. म्हणे घाण वाटते. शिट!” त्याने तोंडावर पांघरुण घेतले.

शालिनीबाई दबकत बाहेर आल्या त्यांनी रमाच्या बेडरुमच्या दारातून डोकाऊन पाहिलं. आत रमा पलंगावर गुडघे जवळ घेऊन त्यात डोके खुपसून बसली होती. ती बहुधा रडत असावी. बाहेर अखिलेशची रागारागाने बडबड चालु होती. शालिनीबाई आंत गेल्या. पलंगावर तिच्या शेजारी बसत त्यांनी तिच्या खांद्यांवर हात ठेवला. तिने मान वर करून त्यांच्याकडे पाहिले. आणि परत मान खाली घालून हुंदके देणं सुरु केलं.

शालिनीबाईंनी हळुवार आवाजात विचारलं.” काय झालं? काही अडचण आली का? अखिलेश राव असे रागावून बाहेर का आले?” “नाही गं, नाही जमत मला. कसंतरीच वाटतं. हे थोडासुद्धा धीर धरायला तयार नाहीत. लगेच डोक्यांत राख घालून घेतात. सगळं संपलं गं.” परत तिने हुंदके देणं सुरु केलं. काय केलंत तुम्ही? कुठे अडचण आली?”तिने हाताची मूठ ओठांपुढे धरत मागे पुढे हलवली. आणि परत मान खाली गुडघ्यांमधे घातली.” आणि दुसरं काही?”तिने फक्त मान नकारार्थी हलवली. शालिनीबाई बाजूला बसून थोडावेळ विचार करत राहिल्या. आता जावयाला पण काही कानमंत्र देणं भाग होतं. त्यांनी पटकन मनाशी निर्णय घेतला आणि त्यांनी रमाला सांगीतलं.” चल पटकन आत जाऊन तोंड धुवून घे आणि अखिलेश रावांना आंत बोलाव.” तिने चमकून वर पाहिलं.” चल जा. मी सांगते तसं कर लवकर.” रमा उठली आणि बाजूच्या ऍटॅच्ड बाथरुममधे गेली आणि तोंड धुवून आली. बाहेर आल्यावर तिने बेडरुमच्या दारांतूनच अखिलेशला हाक मारली.” अहो जरा इकडे या. आई बोलावते आहे.”

अखिलेश कोचावर भिंतीकडे तोंड करून पडला होता. तो जरा कडवट तोंड करत उठला आणि बेडरुमच्या दारात येऊन उभा राहिला.

“अहो अखिलेश राव या जरा इकडे.” असे म्हणत शालिनीबाईंनी पलंगाच्या पाठीला एक उशी उभी करून लावली आणि त्याच्या समोर गादीवर थाप मारली. अखिलेश येऊन आणि उशीला टेकुन बसला. पुढे येणारा लुंगीचा भाग त्याने नीट लपेटून घेतला.” अहो, आमची रमा एकदम साधी सुधी मुलगी आहे. तिला कदाचित सगळ्या गोष्टी माहीती नसतील. तसं मी समजावलं आहे तिला. जरा सबुरीने घ्या म्हणजे झालं. हळू हळू ती पण शिकेलच.”  “अहो, आता तीन वर्ष झालीत आमच्या लग्नाला. मी पण इतकी वर्षे धीर धरलाच होता. आता असं डाव ऐन रंगात आलेला असतांना रंगाचा बेरंग करणं शोभतं का? सगळा मुड गेला माझा. तरी मी रात्री झोपण्यापूर्वी व्यवस्थित फ्रेश होऊन मग अंथरुणावर येतो. आमचे मित्र ज्या गोष्टी पहिल्या रात्रीपासुन करताहेत त्यासाठी मी तीन वर्ष थांबलोय. हॅ… शिट!” असे म्हणत त्याने मूठ मांडीवर आपटली.” लग्नानंतर बिदाइच्या आधी तुम्ही काही सांगीतलेलं दिसत नाहीये तिला. म्हणजे वैवाहिक संबंध कसे ठेवायचे, नवर्याला कसं खुष ठेवायचं असतं ते.” परत तो धुमसतच म्हणाला.


Edit page
Share this post:

मुख्य कथा: सासूबाईंचा कानमंत्र