Skip to content
AstroPaper
Go back

धुकं | भाग ७

Updated:
Edit page

डायरीच पान संपलं. पवनच्या डोळ्यातून अश्रू ओघळून डायरीच्या पानावर पडले.त्याने एक नजर सुबोध वर फिरवली. पापण्या मिटल्या तसे डोळ्यातील पाणी खाली ओघळत आलं. त्याला काल रात्रीच स्वप्न आठवलं.

हे मी काय पाहिलं! अस कस होऊ शकतं! नाही नाही नाही! तो स्वतःशी बडबडत होता.

तो माझ्या वर एवढं प्रेम करतो आणि मी मी अस वागलो त्याच्याशी, मी एवढा घाणेरडा विचार केला त्याच्या विषयी! मी चुकलो मी मी… पवन तोंडावर हात ठेवून हुंदके देऊ लागला. भूतकाळातील एक काळी आठवण त्याच्या मनात चमकली. स्वतःच दुःख मोकळं करताना त्याला सुबोधची झोप नव्हती खराब करायची.

आता अस काही नाही होणार. मी माझ्या चुकांची माफी मागतो. मी तुझी सगळी जबाबदारी घेणार. मी तुला दत्तक घेणार. पवन कसं बस आसव गाळत म्हणाला. तसा सुबोध जरासा हलला. त्याची झोपमोड होतेय हे पाहून पवन त्याची डायरी तशीच टेबल वर ठेऊन बाहेर निघाला. दिवाणखान्यात येताच त्याला जाणवलं मुख्य दरवाजात कोणीतरी उभं आहे कोणी तरी आवाज दिला.

“हाय का कुणी घरात?”

पवनने दरवाजात पाहिलं तर म्हातारा रघु उभा होता. त्यावेळी त्याचा चेहरा दिनवाना नव्हता. वेगळीच चमक होती. जणू तो पवनला खरीखोटी सूनवायला आलाय अशा अविर्भावात होता तो.

“तुम्ही? इथे?” पवनने विचारलं.

“काय सगळं ठीक हाय ना?” रघूने हसत विचारलं.

“हो आहे सगळं ठीक.” पवनने उत्तर दिलं.

“टिन्याने मला संमद सांगितल. मी नको बोलत हुतो तरी तू त्यो दरवाजा उघडला.”

पवनने मुठ्या अवळल्या. अगोदरच तो कालच्या स्वप्नामुळे वैतागला होता.

“नक्कीच काय तरी वंगाळ झालंय ना! नक्कीच काय तरी वंगाळ सपान?” रघु पवनच्या घामाने भिजलेल्या कपड्यांकडे पाहत म्हणाला.

पवन दचकला. ह्याला कसं माहीत?

“तुला जाणवत नसलं तरी मला कळतंय घरात काहीतरी बदल झाला आहे आणि तो बदल चांगला नाही. त्याचेच हे परिणाम हाय. घरावर कसलीतरी अभद्र छाया पडलीया. या छायेखाली मन कसं उदास, खिन्न, निराश, हताश होऊ पाहतं.”

“मला तुमचं प्रवचन नकोय. तुमच्या वयाचा मान राखून मी त्या दिवशी गप्प बसलो पण खूप झालं आता. इथून गपचूप निघा नाहीतर उगाच मला माझी मर्यादा ओलांडावी लागेल.” पवन रागावून म्हणाला.

“तुला आता कळणार नाही मी काय बोलतोय. ही दाढी ही केस उगाच पांढरी नाय झाली. मी घर घ्यायच्या आधी भी तुला समजावलं हुत, ज्या दिवशी ह्या घरात आला तवा बी ताकीद दिली. पर तू काय ऐकायला तयारच नाय. तू नुसता दरवाजा नाय उघडला. मृत्यूचा दरवाजा उघडलाय. लवकर या घरात परत मृत्यू तांडव करल. तू माझ्याकडं येशील पण लय उशिर झाला असलं त्यावेळी.” रघुने तोंडातून आग ओकली. त्याचे हात पाय रागाने थरथरत होते.

एक क्षणासाठी पवन पण घाबरला. आपण काय बोललो त्याचा विचार करू लागला. तोपर्यंत रघु निघून गेला होता.

पवनला काही सुचत नव्हतं. काही वेळ तो सोफ्यावर बसून होता. त्याला स्वतःच्या घामाचा वास जाणवला तसा तो उठला. पवन विचार करू लागला. न्हानी घरात जाऊन त्याने हात पाय तोंड धुतले. त्याला अंघोळीसाठी वेगळा वेळ हवा होता. सगळी काम आटपून अंघोळ करू या विचाराने त्याने स्वतःची खोली आवरली, सुबोधला उठवलं, त्याचं पण आवरलं, त्याची पण खोली आवरली.

आपले घामाचे कपडे उतरवून पवन शॉवर खाली उभा राहिला. पाण्याचा वर्षाव होताच त्याला हलकं वाटलं. त्याने एक नजर बाथटब टाकली. अस वाटलं त्यात पाणी भरून स्वतःला त्यात बुडवून घ्यावं. तासनतास तास त्यात पडून राहावं. पण वेळ नव्हता. आज त्याला शहरात जायचं होतं. ऑफिसमध्ये काही कामे होती. कदाचित घरी यायला रात्र होईल. तो तसाच आजच्या दिवसाचा विचार करत पाण्याच्या धारांखाली उभा राहिला.

म्हातार्या राघूचे शब्द त्याच्या कानात घुमत होते. नक्कीच काय तरी वंगाळ सपान?… घरावर कसलीतरी अभद्र छाया पडलीया… या छायेखाली मन कसं उदास, खिन्न, निराश, हताश होऊ पाहतं… या घरात परत मृत्यू तांडव करल.

त्याने वैतागून नळ बंद केला. टॉवेल गुंडाळून तो आपल्या खोलीकडे निघाला होता तेवढ्यात त्याला घरच्या बाहेर, प्रवेशद्वारातून आत येताना कोणी तरी दिसलं. हातात बॅग घेऊन कोणी तरी येत होत. तो दरवाज्या जवळ गेला. त्याने नीट पाहिलं. अझलान! तो अझलान होता. तो आता उंबरठ्यावर वर आला होता. त्याला पाहताच पवन त्याच्याकडे खेचला गेला.

अझलान आत पाय टाकणार तेवढ्यात पवनने त्याला मिठी मारली. अझलान काही पवनच्या मिठीत मावला नाही पण पवनने त्याला घट्ट मिठी मारली होती. तो जवळजवळ त्याच्या ओठांच चुंबन घेणार होता, पण त्याच्या लक्षात आलं की सुबोध पण दिवाणखान्यातच आहे.

“तू टॉवेल वर काय, नागड्याने जरी माझं स्वागत केलं तरी माझा राग जाणार नाही.” अझलान त्याच्या कानात खुसपुसला. कदाचित ते पवनने ऐकलं नाही.

“तू अचानक कसा आलास? मला कळवायचं ना! मी… मी आलो असतो घ्यायला तुला.” पवन बाजूला होत म्हणला.

“मी म्हणलेलो लवकरच येईल.” अझलान शांतपणे म्हणला.

” पण सांगायचं ना की आज येणार आहेस.” पवन म्हणाला.

“मी काल रात्री तुला खूप कॉल, मेसेज केले पण रिप्लाय नाही मग मी आलो सरळ इथे.”

“तुला पत्ता कसा माहीत इथला?” पवन चटकन बोलून गेला.

“तू सांगितलं होतास चॅट वर! मी आपला चॅट तपासला त्यात मिळाला. नाही तर मला हॉटेल वर थांबव लागलं असत.” अझलान दात खात म्हणाला.

“खरंच सॉरी. काल रात्री खूप गाढ झोप लागली आणि त्यात… “तो बोलता बोलता थांबला. कारण पाठी सुबोध होता.

पवनने अझलानला आत बोलवलं. त्याला सोफ्यावर बसवलं. तो पण स्वतः तयार होऊन आला. तोपर्यंत सुबोध त्याच्याकडे एक टक पाहत होता.

आझलान होताच असा कोणी ही त्याच्याकडे पाहत बसेल. पहिलवानाला पण लाजवेल अशी भरगच्च शरीरयष्टी. त्याला शोभेल असा आवाज. नजर पडताच डोळ्यात भरते ती त्याची गोल पसरट छाती. एखाद्या गोल खांबा सारखे पाय. इथल्या वातावरणामुळे त्याचे लाल झालेले गाल, लाल ओठ, जाड भुवया त्याखाली सुरमा घातलेले डोळे. त्याची आणि अझलानची नजरानजर होताच एक स्मितहास्य तो देत. सुबोध जरा कचरत होता त्याच्याशी बोलायला.

“हा माझा सर्वात जवळचा मित्र, अझलान” पवनने सुबोधला ओळख करून दिली. “आणि हा माझा पुतण्या सुबोध.”

अझलानला अंदाज आला की पवनने अजून सुबोधला त्यांच्या नात्याबद्दल खरं सांगितलं नाही.

“हो मी याचा सर्वात जवळचा मित्र” अझलान हात पुढे करत सुबोधला म्हणाला. सुबोधने त्याच्याशी हात मिळवला. सुबोधला जरा वेगळंच वाटलं. त्याचा स्पर्श उष्ण होता. सगळ्यांच चहापाणी झालं. पवननेच केलेला चहा.

त्याने अझलानला स्वतःच्या खोलीत नेलं. ते एकत्रच राहणार होते. खोलीत जाताच अझलान बॅग फेकली आणि पवनवर झडप टाकली. वेड्यासारखा दोघे एकमेकांना बिलगले. एकमेकांवर चुंबनाचा वर्षाव करू लागले. जणू खूप वर्षांनी दोघांची भेट झाली होती. पण जास्तीतजास्त काही महिने झाले असतील. अझलानने आपला हात पवनच्या प्यांटमध्ये टाकला. त्याचा लंड तो चापचू लागला.

नेहममीकडक असणारा आठ इंचाचा दांडा खूप वेळ झाला तरी एका वाळक्या काडी प्रमाणे होता. खूप वेळ झालं तो निर्जीवच राहिला. अझलानला अचानक अस वाटलं की आपणच त्याच्या तोंडात तोंड घालतोय, त्याच्याकडून काही प्रतिसादच नाही! अझलान थांबला पवनकडे बघू लागला.

“काय झालं?” अझलानने विचारलं.

“मला… मला काही सुचत नाही काय बोलू.” पवन चाचरत म्हणाला.

“काही काळजी करू नकोस मी आलोय ना!” एवढं बोलून अझलानने त्याला मिठीत घेतलं. काही क्षण ते तसेच राहिले. पवनचा चेहरा पाहिला. डोळ्यात तेज नव्हतं. चेहरा तुकतुकीत नव्हता. काळी वर्तुळ निर्माण झाली होती. त्याच्यातून जणू कोणी हळूहळू त्याची शक्ती शोषून घेते होत.

“मला निघायला हवं. आज ऑफिसमध्ये बोलवलं आहे.” पवन बाजूला सरत म्हणला. “मी लवकर येण्याचा प्रयत्न करेन. आपण बाहेर जाऊ जेवायला.”

“नको! तू येणार केव्हा परत आणि आपण जाणार केव्हा.” एकच गाडी असल्याने अझलान म्हणाला. “मी बघतो तू नीट जा!”

पवन आवरून ऑफिससाठी निघून गेला. इकडे सुबोध आणि अझलान दोघे पण घरी. दोघांची काही ओळख नसल्यामुळे एक अस्वस्थता होती घरात.

अझलान घरात फिरत घर बघत होता. त्याची पण नजर त्या दरवाजा वर पडली. त्या वर विचित्र प्रकारे कोरलेले वर्तुळ त्याचे लक्ष खेचत होते. या वेळी तो दरवाजा उघडा होता आणि त्याच्या पार ते जंगल. काही जागा असतात त्या नजर खिळवून ठेवण्यासाठीच.

अझलान पण टक लावून बाहेर बघत बसला.अन सुबोध त्याला. अझलानचा फोन वाजला आणि सुबोधने नजर दुसरीकडे फिरवली.

“मी आजच पोहोचलो आहे. अजून तरी बोलणं झालं नाही पण लवकरच मी विषय काढेल आणि कागदपत्रे हस्तगत करेल.”अझलानच फोनवरील संभाषण ऐकून सुबोध आवाज न करता आपल्या खोलीकडे सरकला.

संध्याकाळ झाली. दिवस मावळला. रात्र आली. आज खूप दिवसांनी घरातील शेकोटी पेटत होती. तिच्या समोरच्या सोफ्यावर अझलान बसला होता. शॉर्ट प्यांटमध्ये शर्ट न घालता. पवनची वाट बघत.

“सॉरी तुला वाट बघावी लागली.” पवन म्हणाला.

“ईट्स ओके रे! त्यात काय एवढं ये बस.” अझलान सोफ्यावरून सरकत म्हणाला.

पवन त्याच्या शेजारी जाऊन त्याला खेटून बसला. दोघांनी आपले हात एकमेकांत गुंफले. एकमेकांच्या मांड्या चिटकवल्या. दिवाणखान्यात अंधार होता. शेकोटीचा प्रकाश दोघांवर पडत होता. दोघांची ही शरीरे लाल दिसत होती. शेकोटीच्या उबेमुळे त्यांची शरीरे तप्त झाली होती. खरं तर एकमेकांच्या पाहूनच ते दोघे तापले होते. अझलानला तर सकाळपासून केव्हा पणनला जवळ घेतोय अस झालं होतं. आता त्यांना एकांत मिळाला होता.

अझलानने त्याच्या हाताने पवनच्या कंबरला स्पर्श केला. काही वेळाने त्याने पवनच्या मांडीला आकस्मित स्पर्श केला… तरीही पवनचा चेहरा खूप निर्दोष होता. त्याने पवनला आरामदायक वाटत होते. थकलेल्या शरीरावर कोणीतरी मोरपीस फिरवावे तस.


Edit page
Share this post:

मुख्य कथा: धुकं