Skip to content
AstroPaper
Go back

लेडीज टेलर | भाग ४

Updated:
Edit page

त्याने माझ्या नग्न छातिच्या उभारांकडे बघण्याचा जराही प्रयत्न केला नाही व जणू काही घडलेच नाही अश्या आविर्भावात तो बाहेर निघून गेला. मी त्याला काही बोलूच शकले नाही व वेडयासारखी तेथेच उभी राहिले.

मी फार गोंधळून गेले व माझ्या मनात विचारांचे मोहोळ उठले. पण माझ्या मनाची मीच समजूत घातली की तो अगदी प्रोफेशनलपणे वागत होता व ज्या तर्हेने तो वागत होता त्यावरून असे वाटत होते की हे त्याचे नेहमीचेच काम होते.

जाता जाता तो दरवाजा ओढून घ्यायला विसरला नाही. मग काही क्षणानंतर तो परत आला व दरवाज्यावर नॉक करून आत आला. मला हाताने आपली छाती झाकून घेत तेथेच उभी असलेली बघून त्याला हसू आले. त्याने ब्लाऊज माझ्या खांद्यावर ठेवला व तो पुन्हा बाहेर निघून गेला.

जे चालले होते त्याला मी विरोध करायला हवा होता ह्या विचाराने माझे आतले मन मला खात होते पण आश्चर्य म्हणजे माझे बाह्य अंग मला दगा देत होते व जे चाललेय त्याने मी उत्तेजित होत होते.

तो दुसरा ब्लाऊज हातातून घालून मी छातीवर आणला व नीट केला. माझ्या लक्षात आले की हा दुसरा ब्लाऊज स्लीवलेस होता. मी निर्लज्जपणे सागरला हाक मारली. ह्यावेळी तो नॉक वगैरे करण्याची फॉरमॅलीटी न करता सरळ आत आला व मिश्कीलपणे हसत माझ्या मागे गेला.

एखाद्या सराईतासारखा तो माझ्या ब्लाऊजच्या नाडया बांधू लागला. माझ्या पाठीचे भरपूर स्पर्शसुख घेत त्याने सगळ्या नाडया व्यवस्थित बांधल्या. तो ब्लाऊज माझ्या अंगावर परफेक्ट बसत होता व त्याने मला स्वतःला नीट आरश्यात बघायला सांगितले.

मी आजूबाजूच्या सगळ्या आरश्यात दिसत असलेले माझे प्रतिबींब न्याहाळू लागले. माझ्या पाठीचा भाग एका आरश्यातून रिफ्लेक्ट होत दुसर्या आरश्यातून मला स्पष्ट दिसत होता. नाडया त्याने आवळून बांधलेल्या असल्यामुळे माझ्या गोर्या गोर्या मांसल पाठीवर त्या रूतल्या होत्या व नाडीच्या दोन्ही बाजूने माझी त्वचा फुगीर होवून उठून दिसत होती.

सागर पुन्हा माझ्या मागे गेला व तो आवडीने माझी पाठ न्याहाळू लागला. मग त्याने मला पदर खांद्यावरून घ्यायला सांगितला. अरेच्चा! तोपर्यंत मी पदर विसरूनच गेले होते. माझी मलाच शरम वाटली आणि मी लगबगीने कंबरेला खोचलेला पदर काढला आणि खांद्यावरून अंगावर घेतला. सागरने माझा पदर पकडून थोडा इकडे-तिकडे ॲडजस्ट केला.

मग माझ्या भोवती फेरी मारून त्याने मला सगळ्या बाजूने न्याहाळले व खूष होवून तो माझी स्तुती करत मला म्हणाला, “गीता मॅडम, तुम्ही एकदम सुंदर आणि सेक्सी दिसत आहात! पण तुम्ही तुमची कंबर अजून थोडी एक्सपोज करायला हवी जेणे करून तुमची पर्सनॅलिटी अजून उठून दिसेल. जस्ट सेकंद हं, ” असे बोलून तो पुढून माझ्याजवळ आला.

त्याने माझ्या पोटाखाली साडीत बोटे घालून माझी साडी खाली सरकवली आणि तो मिश्कीलपणे हसत म्हणाला, “साडीची कड कमीत कमी एक ते दोन इंच बेंबीच्या खाली असावी आणि तुम्ही तर बेंबीच्या खाली नक्कीच नेसावी कारण तुमची बेंबी चांगलीच खोलगट व सुंदर आहे. तुम्ही अगदी अभिमानाने त्याचे प्रदर्शन करायला हवे. तुम्ही बेंबीच्या इतकी खाली साडी नेसली तर सगळे पुरूष तुमच्यावर फिदा होतील आणि सगळ्या बायका तुमचा मत्सर करायला लागतील.”

सागर माझी तारीफ करत होता आणि त्याने मी मनोमन सुखावत होते. त्याला बरोबर माहीत होते की बायकांना कसे आणि काय बोलून खूष करावे. पुन्हा तो एक दोन पाऊले मागे गेला व त्याने मला वेगवेगळ्या पोज घ्यायला लावल्या.

मग माझ्याकडे निरखून बघत तो म्हणला, “एक गोष्ट फक्त खटकत आहे तुमच्यामध्ये. ते म्हणजे तुमचे काखेतले केस! तुम्ही तुमच्या काखेतले केस व्यवस्थित स्मूथली काढून टाकायला हवे.”

त्याच्या कॉमेंट्सने मी गोंधळून गेले व माझा एक हात वर करून त्याला माझी काख दाखवत म्हणाले, “का? ही माझी काख स्मूथ नाही?”

तो माझ्या अगदी जवळ आला आणि दिलखुलासपणे हसत त्याने आपली बोटे माझ्या काखेवरून वर-खाली फिरवली. त्याने मला गुदगुल्या झाल्या व मी खुद्कन हसले. त्याच्या स्पर्शाने मी अजून उत्तेजित व्हायला लागले. तो नकारार्थी मान हलवत म्हणाला, “उंऽऽहंऽऽऽ… हे केस तर दोन दिवस दाढी न केलेल्या पुरूषाच्या खुंटासारखे वाटतात.”

त्याच्या उदाहरणाने मला हसायला आले आणि माझ्या नकळत मी त्याला म्हणाले, “ पण मी तर आज सकाळीच इथले केस काढले.” मग माझ्या लक्षात आले की मी त्याला माझी अगदी खाजगी गोष्ट सांगत आहे तेव्हा मी पुढे काही बोलले नाही. पण त्याला जे कळायला पाहिजे होते ते कळले होते.

तो म्हणाला, “तुम्ही काढले असतील सकाळी तिथले केस पण कशाने? कदाचित तुमच्याकडे चांगले हत्यार नसावे. मी तुम्हाला एक स्पेशल हत्यार दाखवतो, ” असे बोलून तो पटकन बाहेर निघून गेला व झटकन परत आला.

“हे बघा. हे हत्यार बघा, गीता मॅडम. अल्ट्रा मॉडर्न ट्राय-टॉप रेझर. खास बायकांसाठी आणि त्याबरोबर ही इंपोर्टेड क्रिम. खरे तर हा पुर्ण सेटच इंपोर्टेड आहे आणि हा वापरला तर अतिशय स्मूथ शेवींग होते, जी जास्त दिवस टिकते. तुम्ही ट्राय करून बघता का?” त्याने एखाद्या सराईत सेल्समनसारखे मला विचारले.

मी तो शेवींग किट बघून हरखून गेले! त्याने मला ट्राय करायला सांगितले पण कोठे? येथे त्याच्या शॉपमध्ये? एका टेलरींग शॉपमध्ये मी माझ्या काखा शेवींग करतेय ह्या कल्पनेची मला प्रचंड शरम वाटायला लागली. माझी अवघडलेली मन:स्थिती सागरच्या लक्षात आली आणि तो पटकन मला म्हणाला, “गीता मॅडम, प्लीज जरा मागे वळा.”

त्याने मला फारच आग्रह करत म्हटले. मला काही बोलण्याची उसंत न देता त्याने स्वतःच मला फिरवले व माझ्या पाठीवरील ब्लाऊजच्या नाडया सोडायला सुरूवात केली.

“तुम्ही काय करत आहात?” मी गोंधळून गेले व समोरील आरश्यातील त्याच्या प्रतिबींबाकडे बघून त्याला विचारले.

“तुमची तयारी करतोय.” त्याने आरश्यातूनच प्रश्नार्थक मुद्रेने माझ्याकडे बघत उत्तर दिले व नंतर तो मोकळेपणे हसला.

“ पण बाथरूम कोठे आहे? मी तेथे जावून शेवींग करते.” मी प्रश्न केला.

तो हसत म्हणाला, “ओह नो! हा अगदी महागडा किट आहे. अगदी जपून वापरायला हवा. तेव्हा तुम्ही ते काम माझ्यासारख्या एक्सपर्टवर सोपवा.”

आमचे एवढे बोलणे होईपर्यंत त्याने ब्लाऊजच्या नाडयांच्या सगळ्या गाठी सोडल्या होत्या. मी हतबलपणे स्तब्ध उभी होते आणि त्याने माझ्या दोन्ही खांद्यांवरून ब्लाऊज खाली खेचला व सहजपणे काढून टाकला. मी पटकन माझ्या पदराने माझी नग्न छाती झाकून घेतली.

त्याक्षणी मला जसे वाटत होते व जी उत्तेजना मी अनुभवत होते तसे फिलिंग मला या आधी कधीही झाले नव्हते. त्याला खरे तर मी विरोध करायला हवा होता पण का कोणास ठाऊक मी तसे करत नव्हते. मी पाणी घेवून येतो असे म्हणत तो ब्लाऊज घेवून बाहेर गेला.

मला जणू एका जागी बांधून ठेवले आहे अश्या तर्हेने मी जागीच उभी होते व नकळत मी माझ्या काखेमध्ये हात फिरवू लागले. दरवाज्यावर नॉक न करताच सागर पाणी घेवून आत आला व त्याच्याकडे तो मी घातलेला ब्लाऊज नव्हता. मला काखेतून हात फिरवताना बघून त्याला हसू आले आणि तो माझ्याजवळ आला.

मी माझ्या उजव्या हाताने माझा पदर माझ्या छातीवर धरून ठेवला होता तेव्हा त्याने माझा डावा हात पकडून वर करत म्हटले, “प्लीज! हा हात असा वर डोक्यावर ठेवा.”

त्याने माझी डावी काख उघडी पडली व तो माझ्या अजून जवळ सरकला. त्याचा चेहरा आता माझ्या उघडया काखेच्या आणि छातिच्या अगदी जवळ होता. माझ्या काखेतून घामाचा उग्र वास येवू लागला व तो त्याला नक्कीच जाणवत असणार.

त्याने माझ्या काखेत पाणी लावले व सराईतपणे सगळा भाग ओला केला. मग मुलायमपणे बोटे फिरवत त्याने त्या भागावर क्रिम लावली. क्रिमने माझ्या काखेचा भाग थंड पडला आणि त्या थंडाव्याने मी सुखावले!

तसे पाणी आणि क्रिम लावताना त्याच्या हाताचा कळत-नकळत स्पर्श माझ्या छातिच्या उभाराला होत होता पण मी ऑब्जेक्शन घेत नव्हते. मग त्याने ते रेझर घेवून माझ्या काखेत शेवींग करायला सुरूवात केली.

मी सकाळीच तेथले केस काढलेले असल्यामुळे त्याला पुर्ण काख शेव्ह करायला वेळ लागला नाही. पण तसे शेवींग करताना त्याचा हात माझ्या डाव्या छातिच्या उभाराला सतत लागत होता व माझ्या ताठर निप्पलाचे स्पर्शसुख त्याला सारखे मिळत होते. त्याने माझी डावी काख पुर्णपणे शेव्ह केली.

शेवींग झाल्यावर त्याने तो भाग कोरडा केला व त्यावर हात फिरवत मला म्हणाला की मीही तेथे हात फिरवून चेक करावे की शेवींग कशी झाली आहे ते. मी उजव्या हाताने धरलेला पदर सोडून दिला आणि माझ्या डाव्या काखेत हात फिरवून पाहू लागले.

माझी शेव्ह केलेली काख मला मुलायम आणि मऊ मऊ भासत होती. त्याचवेळी माझ्या मागून तो उजव्या बाजूला आला व तसे येताना त्याचा पार्श्वभाग माझ्या नितंबांना घासत गेला. त्याचा पार्श्वभाग माझ्या नितंबाला घासला तेव्हा मला जाणीव झाली की पॅन्टमध्ये त्याचा लंड कडक झाला होता.


Edit page
Share this post:

मुख्य कथा: लेडीज टेलर