तसं तो म्हणाला.. ” अहो त्यात काय मुंबईत तर हे कॉमन आहे.. आणि फक्त मेकअप तर करायचा आहे आणि तसही अशावेळी जास्त रेट लावायचा.. त्याने कमाई पण जास्त होते.. कसं..? असे म्हणून ते हसायला लागले.. मी वैतागून म्हणाले.. ” प्लिज तुम्ही आता शांत राहता का नाहीतर आम्हीच जातो दुसर्या टेबल वर.. त्यावर त्यातील एक रुबाबदार तरुण म्हणाला.. ” अरे जाऊदे रे आपला चेहरा मॅडम ना आवडला नसेल.. ” तसही मॅडम आम्ही एवढे पण वाईट नाही हा.. हा बघा हा रोहित I T कंपनी मध्ये जॉब करतो.. पगार फक्त ३ लाख महिना.. हा केदार multinational कंपनीत मॅनेजर.. पगार फक्त ५ लाख महिना.. हा अमर याचा बिजीनेस आहे स्वतःचा.. पाच करोडचा महिना टर्न ओव्हर… आणि माय सेल्फ अमित.. पाटील अँड पाटील इन्फ्रास्ट्रक्चर नाव ऐकलं का.. मी दचकले आणि म्हणाले. ” हो.. तसं तो म्हणाला ते आमचंच आहे.. ” मी तर गारच झाले होते.. अहो एवढ्या मोठ्या लोकांकडे तर स्वतःचे मेकअपमन देखील असतील ना.. त्यावर ते सर्व मोठ्याने हसले.. अहो मॅडम मेकअप मन आम्ही ठेवायला काय ऍक्टर नाही आहोत आणि तसही असले तरी तुमच्यासारखे सुंदर आणि घरगुती मटेरियल नाही ना… मी तर आता चक्रावलेच.. अहो घरगुती काय म्हणताय नक्की…? ? तसे तर भानावर आले आणि म्हणाले “म्हणजे सनी लियोनी आणि अमृता राव मध्ये फरक असतो मॅडम.. आम्ही नेहमी मुंबईत चुलीवरच जेवण शोधत फिरत असतो… पिठलं भाकर, गावठी रस्सा याला जास्त पैसे देतो आम्ही.. आपल्याला तर सात्विक सौन्दर्य खूप आवडतं बाबा.. ” मी आता भरभर जेवण संपवले आणि उठले.. ” तुम्ही समजत असाल त्यातल्या आम्ही नाही चला बाय.. ” अहो मॅडम राग धरू नका आमचा उद्देश वाईट नव्हता.. आणि चांगल्या सौन्दर्याची तारीफ करू नये का..? अहो इथे खुप आल्या आहेत मैत्रिणी आणि पाहुणे मंडळी त्यातील बघा.. मी रागात वरती निघून आले पण एवढ्या संभाषणात अंकिता मात्र गालातल्या गालात हसत असल्याचे मला जाणवले..
आम्ही आमच्या रूम मध्ये आलो आणि मी दार लावून घेतले आणि अंकिताला म्हटलं अग ते एवढे सरळ सरळ फ्लर्ट करत होते आणि तू काहीच बोलली नाहीस.. तशी ती म्हणाली अहो ती माणस किती मोठ्या घरातील आणि राग येऊन आपल कॉन्ट्रॅक्ट गेलं असत मग..? हे बघ अंकिता मोठ्या कॉन्ट्रॅक्टसाठी मी फालतूगिरी सहन करणार नाही.. तू सांगून टाक तुझ्या मित्राला इथे आम्हाला त्रास झाला तर आम्ही निघून जाऊ.. मॅडम तुम्ही शांत व्हा मी सकाळी सांगते त्याला व्यवस्थित आणि आता झोपा शांत.. उद्या सकाळी लवकर उठून बरच काम करायचं आहे तीन दिवस सलग प्रोग्रॅम आहेत आणि तिन्ही दिवशी मेकअप करायचे आहेत.. चला झोपा बघू.. अस म्हणून अंकिता ने लाईट सुद्धा बंद केली.. ” मी विचारात पडले होते की मुंबईत आल्यावर अंकिता एकदम फ्री वागत होती. आणि सराईत असल्यासारखी वागत होती.. प्रवासाच्या त्रासाने तशी विचार करता करता लगेच झोप लागली..
सकाळी लवकर सहा वाजता उठून आम्ही सात पर्यंत तयार झालो आणि आमच्या कामाला लागलो.. दोन मुली देखील आता आमच्या मदतीला आल्या होत्या.. कार्यक्रम साधारण अकरा वाजता सुरू होणार होता आणि आम्हाला किमान पंचवीस जणांचा तरी मेकअप पूर्ण करायचा होता आणि त्यात काही स्त्रियांचे तर खूपच नखरे चालू होते.. ज्या ठिकाणी मेकअप करत होतो तिथेच तरुण पुरुष सुद्धा मस्करी करायला यायचे एकंदरीत त्यांच्यात एकमेकांना आलिंगन देणे हे तसं नॉर्मलच होत.. आम्ही आमच काम गपचूप करत होतो पण मध्ये मध्ये त्यांच्या चेष्टा मस्करी मुळे आम्ही देखील विचलित व्हायचो मध्ये मध्ये तर आमची देखील चेष्टा व्हायची..
एक तर म्हणाला काही म्हणा पण आमच्या मित्राने मेकअप करणारी बाकी भारीच आणली आहे एकदम “मॅरेज मटेरियल विथ क्युट फेस”.. मला आता लाजाव की रागावायच कळत नव्हतं.. मी मुद्दाम माझं मंगळसूत्र वर काढलं.. तसे ते म्हणाले.., ” बघा बघा रे लायसन आहे…उगाच नो एन्ट्री मध्ये घुसू नका.. आणि हसायला लागले.. तसा एकजण म्हणाला.. “अरे पण आम्ही कुठे ट्राफिकचे नियम पाळतो.. सिग्नल तोडायचा आणि पावती फाडायची.. असून असून किती असणार दंड..? असे म्हटल्यावर सर्वच हसायला लागले त्यात त्या स्त्रिया देखील सामील झाल्या.. आम्ही पुरत्या खजील झालो.. मी तर खाली मान घातली ती काढलीच नाही.. तशी एक बाई म्हणाली.. ” ए चला आता इथून आमचा मेकअप होउदे आधी, नाहीतर इथेच दुपार व्हायची.. आणि काय नाव ग तुझं.. तिने मला विचारलं.. मी म्हटलं, ” सुमेधा”.. छान नाव आहे आणि ऐक आमचा मेकअप झाला की याना जरासा फेस पॅक लाव.. चला आता.. तसे सर्व जेन्ट्स उठले आणि दुसरीकडे गेले.. मी म्हटलं, अहो आम्ही गावाकडच्या आहोत आणि आम्हाला पुरुषांचा मेकअप नाही करता येत… तशी ती म्हणाली अग इथे सर्रास सर्व करतात.. नुसते फेसपॅक चेच पाचशे टीप देतील ते… मी मनात चरकले.. “या लोकांना पैशाची काही किंमतच नाही का..? तशी पैशाची खरी किंमत आमच्याशिवाय यांना काय कळणार म्हणा.. ” पण पैसा शेवटी गरजेचा तर होताच आणि मी विचार करत होते की आपल्याला थोडीच त्या मुलांशी लगट करायची आहे वरवर मेकअप करून एवढे पैसे मिळत असतील तर तसे वावग काही नाही.. ” मी म्हटलं.. ” अहो आधी तुमच्या लेडीजचे मेकअप तरी होऊदे मग विचार करू.. ” तशा त्या म्हणाल्या अग बायकांचं मन कधी भरत का..? तू त्यांना सांगायचं झाला मेकअप चला आता उठा.. आणि हसायला लागली.. तसे बघता बघता आम्ही चौघांनी बर्याच जणींचा मेकअप संपवला होता आणि आरशात पाहून त्या खुश देखील होत होत्या.. बघता बघता दहा वाजले आणि आम्ही सर्व लेडीजचा मेकअप वेळेत संपवला.. आता पूर्ण दिवसभर आम्हाला फक्त प्रत्येकीला टच अप करावं लागणार होतं.. एवढ्यात ते तरुण टपकले आणि चला आता आमचा मेकअप अस बोलून खुर्चीवर बसले..
मी तीनही मुलींना एका एकाचा मेकअप करायला सांगितले.. तसा ज्याने आपलं नाव अमित सांगितलं होतं तो म्हणाला.. आणि मॅडम तुम्ही नाही करणार..? मी बावरले आणि म्हणाले.. न न म्हणजे या करतील ना.. तसा तो म्हणाला मॅडम माझा मेकअप तर तुम्हीच करणार.. मी म्हणाले.. ” अहो या करतील ना” नाही नाही तुमच्या एवढ्या या तरबेज नाहीत.. ” अहो मेकअप चांगला झाला तर दोन हजार फक्त टीप.. मी काहीही बोलले तरी यांचे उत्तर असणारच होत.. मी नाईलाजाने त्याला बसायला सांगितलं आणि मेकअप सुरू केला.. गालाला हात लावल्यावरच तो उडाला.. ” ओहह माय गॉड एवढा मुलायम हात.. मॅडम तुम्ही खरच खूप सुंदर आहात.. मी म्हणाले प्लिज तुम्ही पर्सनल बोलू नका.. मी विवाहित आहे.. ” अहो त्यात काय मी काय लग्नाची मागणी नाही घालत आहे.. बरं बर करा मेकअप.. मेकअप करताना त्याची नजर नुसती माझ्यावर होती कधी खाली वाकताना काही दिसेल या उद्देशाने नुसता पाहत होता.. मला कसेसेच झाले होते.. एकदाचा आम्ही मेकअप संपवला आणि त्यांनी सर्वांना मिळून पाच हजार दिले.. मी म्हणाले अहो एवढे पैसे कशासाठी..? तसे ते म्हणाले ” अहो तुमच्या कलेसाठी.. आम्ही कलेचे भोक्ते आहोत.. आता दिवसभर पुन्हा आमचं टच अप करायचं.. आणि त्यासाठी नको म्हणू नका… ” मी म्हणाले ठीक आहे.. आता दिवसभर कुणाचा मेकअप प्रॉब्लेम झाला किंवा उतरला तर आम्हाला सज्ज राहायचं होत.. आणि आम्ही सज्ज होतो..
बघता बघता दुपार झाली आणि जेवणाची वेळ झाली.. आम्ही बुफे लावलेल्या ठिकाणी जेवण घेतलं आणि मनसोक्त जेवणावर ताव मारला.. दुपारपर्यंत तशी मेकअप टचअप ची गरज लागली नव्हती पण मला खात्री होती जेवणानंतर नक्कीच सर्व मला शोधणार म्हणून आम्ही चारही जणी पटकन जेवून उठलो आणि मेकअप रुम मध्ये गेलो.. तशा बायका आम्हाला शोधत येतच होत्या.. प्रत्येकीचा मेकअप व्यवस्थित करून दिला.. दुपारनंतर थोडा वेळ कार्यक्रम चालू असणार होता आणि नंतर रात्री मोठी साग्रसंगीत पार्टी कार्यक्रम होता.. त्यासाठी वेस्टर्न थीम ठेवण्यात आली होती.. त्याही कार्यक्रमाचा मेकअप आम्हाला करावा लागणार होता.. बायकांचे टच अप संपल्यावर त्या तरुणांचा ग्रुप आला आणि आमच्या समोर बसून म्हणाला चला मॅडम आता आमचा नंबर.. आमच्या तीनही मुली मनातून बेहद खुश दिसत होत्या.. त्यांनी चटकन एकेकाचा मेकअप व्यवस्थित केला आणि अमित मात्र माझ्याकडे आला आणि म्हणाला मॅडम अपुन को सिर्फ तुम्हीच पसंद हैं.. मी पुरती शरमले.. ” अहो म्हणजे मेकअपसाठी ओ, ” तसं मी चटकन मेकअप करून दिला.. जाताना पुन्हा पाठी वळून तो म्हणाला रात्री वेस्टर्न पार्टी आहे तर आमचा स्पेशल मेकअप करायचा.. एकदम झक्कास दिसलो पाहिजे.. अस बोलून ते निघून गेले…