Skip to content
AstroPaper
Go back

बाहेरचं जेवण

Updated:
Edit page

“तुझी खूप आठवण आली आज.”

“मग यायलाच पाहिजे ना बायकोची आठवण.”

“अगं पण इतकी आठवण येत होती की सुट्टी काढून घरी यावं आणि तुला असं मिठीत घ्यावं वाटत होतं.”

त्याने जवळ येत तिला मागून मिठी मारली व कमरे भोवती हात गुंफले.

“अहो सोडा, किती कामं पडलीयेत माझी.”

“मी नाही सोडणार.” त्याने मिठी अधिकच घट्ट केली.

“पडू दे तुझ्या कामांना कुठं पडायचे तिकडे. तू अशीच मा‍झ्या गळ्यात पडून राहा.” असं म्हणत त्याने तिचा त्याचा चेहरा तिच्या मानेत रूतवला. नाकाने तिला हुंगत, मानेवरती नाक घासत तो वर सरकू लागला‌.

“अशीच गळ्यात पडून राहिले तर स्वयंपाक कोण करणार? उपाशी झोपावं लागेल मग आज!” त्याला दूर सारायचा खोटा प्रयत्न करत ती म्हणाली.

खरं तर तिलाही त्याची ती गोड मिठी हवीशी वाटत होती.‌

“आजचा दिवस बाहेर जाऊ जेवायला, एवढं काय त्यात?”

त्याने कमरेवरचा हात वर सारत हळुवारपणे पोटावर त्याच्या हाताची बोटे फिरवायला सुरूवात केली. तिच्या कानाच्या पाळीच्या हलकासा चावा घेतला.

“आऊचऽऽ!!”

ती हळूच ओरडली नंतर कोपराने त्याच्या पोटात ढोसलं आणि ती त्याच्यापासून दूर झाली.

“परवा पण असंच झालं. मी नाही फसणार या गोड बोलण्याला.”

ती त्याच्यापासून दूर जाऊ लागली.

“या आठवड्यात तीन वेळा बाहेर जेवायला गेलोय आपण, एवढं बाहेरचं खाणं चांगलं असतं का हेल्थसाठी?”

ती चालत किचनकडे निघाली होती, तिच्या मनाचा निर्धार झाला होता.

त्याने तिला भिंतीवरती ढकललं, हातावर हात ठेवले आणि तिच्या चेहर्याचा जवळ चेहरा नेत डोळ्यात पाहत विचारलं, “कोण म्हणतं बाहेरचं खाणं चांगलं नसतं?”

तिचा श्वास किंचितसा चढला होता. तिचे ओठ त्याच्या ओठांच्या स्पर्शासाठी उत्सुक होऊन थरथरू लागले. तिने तिचा चेहरा पुढे केला आणि तिचे थरथरणारे ओठ त्याच्या ओठांवर टेकवले.

तिच्या विरोधाची अपेक्षा असल्याने तिने अचानक केलेल्या चुंबनाने तो दचकला. त्याच्या हाताची पकड ढिल्ली झाली आणि ते चुंबन अनुभवत त्याने डोळे झाकले.

त्याची पकड ढिल्ली होताच त्याने तिचा हात खाली नेला आणि त्याच्या ताठरलेल्या इंद्रियावर हळूच फिरवला. तिच्या हाताच्या स्पर्शाने तो थरथरला.

तिने तिचा हात त्याच्या पॅन्टमध्ये सारत त्याचं लिंग बाहेर काढलं होतं. त्याच्या ओठांपासून ओठ वेगळे करत ती म्हणाली,

“घरी माझ्यासारखी सुगरण बायको असताना सारखं बाहेरचं खाणं चांगला आहे का?”

त्याच्या चकित झालेल्या चेहर्‍याकडे पाहत तिने तिच्या हाताची हालचाल करायला सुरूवात केली.

सरते शेवटी त्या रात्रीही त्यांना बाहेरच जेवायला जावं लागलं. त्याने तिला स्वयंपाक करू दिला नाही. तिलाही त्याला सोडून स्वयंपाक करायला जावंसं वाटलं नाही.


Edit page
Share this post:

Previous Post
राँग नंबर
Next Post
गिफ्ट