Skip to content
AstroPaper
Go back

आतुरता

Updated:
Edit page

“तुला पाहिलं तेव्हापासून मला तुला स्पर्श करायचा होता.” तिच्या मागे उभा राहत, तिच्या हातावर अलगद हात ठेवत तो म्हणाला.

“आता करतच आहेस ना मग तू मला स्पर्श?”

त्याच्या मिठीतून तिने स्वतःला सोडवून घेतलं आणि मान वळवून त्याच्याकडे पाहू लागली. त्याच्या डोळ्यात तिला पाहत असताना येणारी ती चमक तिला प्रत्येक वेळी मोहित करायची.

“किती वर्षांनी ही इच्छा पूर्ण झालीय.” असं म्हणत त्याने तिला जवळ ओढले आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले.

“तीस महिने आणि पंधरा दिवस झाले, आपण एकमेकांना पहिल्यांदा पाहिलं त्याला.”

तिलाही त्याला स्पर्श करायची आणि त्याच्या बाहुपाशात हरवून जाता ते उत्कट प्रणय सुख अनुभवायची इच्छा होती.

“आणि वरचे आठ तास, सात मिनिटे विसरलीस का?” त्याने मोबाईलमध्ये वेळ पाहिली आणि तिला प्रश्न केला.

“नाही मी नव्हते विसरले, तुझ्या लक्षात आहे का ते पाहत होते.” त्याच्याकडे बघत ती त्याच्या शर्टची बटणे काढू लागली.

तिच्या स्पर्शामुळे तो आल्यापासून उत्तेजित झाला होता आणि तिला ही त्या गोष्टीची जाणीव होती. तिने त्याचा शर्ट बाजूला काढून टाकला आणि त्याच्या फुगीर झालेल्या पॅन्टवर हाताने हळूच टपली मारली.

“एवढा काय हा अधीरपणा?” आणि ती त्याच्या पॅन्टचा हूक काढू लागली.

“अधीरपणा आणि हा? मागची अडीच वर्षे वाट पाहिलीय मी या क्षणाची आणि मी अधीर म्हणे.”

तिचा हात अडवत त्याने तिला बाहुपाशात ओढून घेतलं आणि घट्ट मिठी मारली. तिच्या मानेवर मोकळ्या सोडलेल्या केसाचा गंध पुन्हा त्याच्या नाकात शिरला. त्याचे हात तिच्या पाठीवरून सैरावैरा धावत जणू स्वतः शीच स्पर्धा करत होती, की कोण तिला जास्तीत जास्त स्पर्श करतंय.

“सॉरी, खूप वाट पाहायला लावली मी तुला.”

तिने तिचा हात त्याच्या पॅन्टकडे नेला.

“आता तुला काय करायचे ते कर माझ्यासोबत.”

तिने हुक काढताच पॅन्ट खाली सरली.

“हो मी… हवं तेऽऽच ओऽऽऽह…”

त्याचे शब्द घश्यातच अडकले. तिच्या हाताचा स्पर्श त्याच्या उष्ण व ताठरलेल्या अवयवाला झाला. त्याचा श्वास अडकला. घशातून मोठा हुंकार बाहेर पडला.

तिने हळुवारपणे त्याला मागे पुढे करायला सुरूवात केली. एवढी वाट पाहिल्यानंतर पहिल्यांदाच तिचा तो स्पर्श अनुभवताना त्याने उत्तेजनाची परिसीमा गाठली.‌ तिच्या त्या स्पर्शामुळे चांदण्या रात्री, गार वार्यात तो पावसासारखा कोसळला.

“मी म्हणलं होतं ना, माझा हात लागला तर तू अडवू शकणार नाहीस स्वतःला.” ती हसत म्हणाली.

“मी पण म्हणलो होतो, तू समोर असली की कधीच शांत होऊ शकणार नाही मी…” तिच्या स्पर्शाने काही क्षणातच पुन्हा एकदा ताठरलेल्या त्याच्या अवयवाकडे पाहत तो म्हणाला.

एकमेकांच्या स्पर्शासाठी आतुर असणारे व मनाच्या गाभार्‍यात दाटून आलेले ढग त्या दिवशी मनसोक्त कोसळले.


Edit page
Share this post:

Previous Post
गोड बोलणं
Next Post
उकाडा